Text

All posts/experiences/articles has been written and published by मनस्वी राजन( Rajan / Rajendra). Kindly leave your feedback and encourage me to write more and more.
Request you to do not copy and Paste this write-up for any use. All write-up (articles) has been protected by Copy Rights Act.
Do write your honest comment.

Yours,
RaJaN

Sunday, July 3, 2011

सुरुवात...


सुरुवात... मनापासुन... मनापर्यंत..

"व्यासंग" या शब्दाचा अर्थ मला कधी जास्त कळलाच नाही. अर्थ डोक्यात घुसला तो जेंव्हा मी पु.लं. चा "सखाराम गटणे" वाचला आणि पु.लं. च्या सादरीकरणातून ऐकला. व्यासंग, छंद, नाद (खुळा), वेड ,आवड, हौस आणि इंग्रजी मधली हॉबी हे सगळे एकच. फरक फक्त एवढाच की, व्यासंग चांगला कींवा वाईट असतो. व्यासंगाच व्यसन सुद्धा लागतं. सगळ्यांच्या माहितीप्रमाणे व्यसन कधी चांगल्या गोष्टीचं आणि कधी वाईट गोष्टीच असतं. असो..!

एवढी मोठी प्रस्तावना द्यायचं कारण असं की मला सुद्धा बरेच व्यासंग आहेत. व्यसनच म्हणु आपण त्याला. "व्यसन" हा शब्द वापरायला आणि समजायला बरा असतो. चटकन लक्षात येतो. अशा व्यसनांची म्हणजे व्यासंगाची बरीच मोठी यादी आहे माझ्याकडे. सांगायचं म्हटलं तर मला सिगरेट प्यायला आवडते (३ वर्षे झाली या व्यसनाशी फारकत घेतली आहे). मला कॅसीओ वर बोटे फिरवत बसायला आवडते... येत काही नाही मला कॅसीओ मधलं पण हे व्यसन जपायची इच्छा आहे. भिमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांना ऎकायचं व्यसन सध्या माझं जोरात चाललयं. वाचन हे माझ जुनं व्यसन, अगदी लहानपणी मिळणा-या "चंपक","ठकठक" आणि "चांदोबा" सारख्या मासिकांपासुन मी हे टीकवून ठेवलय. इंग्रजी साहीत्य वाचायची हिंमत मात्र कधी केली नाही. कारण मला डीक्शनरी घेऊन बसायला लागत. हे सगळे आमच्या मराठी शाळेचे संस्कार. पण मागच्या आठवड्यात "Memmories of Midnights" नावाचं Sidney Sheldon चं नोव्हेल वाचलं. विशेष म्हणजे मला समजले सुध्दा. अगदी हलवुनच टाकलं या पुस्तकाने. या पुस्तकाच्या प्रत्येक तीन पानांमधे हिंदीचा तीन तासाचा सिनेमा बनू शकतो. अतिशय काल्पनिक पण सगळं कसं खरं-खरं वाटतं.. असंच अजुन एक व्यसन म्हणजे "लिखाण" करणे. कविता काय असते जेंव्हा मला लहानपणी कळालं तेंव्हाच कविता केल्या. पहिल्या ऒळीचा शेवटचा शब्द आणि दुस-या ओळीचा शेवटचा शब्दोच्चार जुळला पाहिजे म्हणजे कविता होते, त्याला "यमक" असे म्हणतात. एक सुध्दा कविता मला तुम्हाला संदर्भासाठी देऊ वाटत नाही. एवढा तो बालिश चाळा होता. खुप दिवस वाटतं होत की मला कविता चांगल्या करता येतील, पण जेंव्हा "कवी ग्रेस" यांच्या कविता वाचल्या ( वाचण्याचा प्रयत्न केला ) तेंव्हा कविता करण्याची हिंमतच उडून गेली. माझे सर्वात favorite "सुरेश भट" वाचले, ऐकले, समजलो तेव्हा मला माझी लायकीच कळली. एवढी आर्तता मला ७० जन्म घेतली तरी येणार नाही.

रोजची डायरी लिहिली.. दैनंदिनी.. बरिचं वर्षे लिहिली. शाळा, कॉलेज, क्लास, ग्रुपसाठी काही छोट्या-छोट्या नाटिका लिहील्या. तिथल्या तिथे सादरीकरणासाठी ब-या होत्या. ज्याची बॅट त्यालाच पहिली बॅटींग या नियमाप्रमाणे या नाटकांमधे सगळी प्रमुख कामं माझीच असायची आणि सगळे सहन सुद्धा करायचे.

२००६ मधे कामानिमित्त फिरावं लागायचं. २००६ च्या अगोदर Marketing च्या कामानिमित्त ब-याच लोकांशी संवाद साधावा लागायचा. ह्या सगळ्या पसा-यामधे मला रोजच्या आयुष्यात घडणा-या अनुभवांची गोष्ट करुन , रंगवून सांगायची सवय लागली. कोणी तरी म्हणाले छान सांगतो आता हे लिहायला सुरवात कर. मग काही अनुभव/प्रसंग लिहिले देखील. Internet वर ओळखीच्या लोकांना वाचायला दिले. प्रत्येकाल आवडले सुध्दा. कुणी सुधारणाही सांगितल्या (व्याकरणाच्या सुधारणेकडे मी काना-डोळा केला).

२००६ पासुन Software इंडस्ट्रीमधे अक्षरश: घाम घाळतोय. हे सगळे लिखाणाचे छंद मागे पडले. सकाळपासून दुस-या दिवसाच्या सकाळ पर्यंत कधी-कधी काम करायचं, त्यामुळे ह्या सगळ्या व्यासंगाला खीळ बसली. आता सध्या वेळ मिळतॊय, म्हटलं करु सुरवात, ती सुद्धा ब्लॉगवरुन.. जास्तीत जास्त लोकांना वाचायला सांगायचं... प्रतिक्रिया घ्यायच्या.. सुधारणा जमत असल्या तर करायच्या.. यातून नक्की काय साध्य करायचं हे माहित नाही. पण व्यसन चांगलं आहे, करत रहायचं.. आपण Observe केलेले अनुभव आपल्या शब्दात सांगायचे.. लोकांपर्यत पोहचवायचे.. बघू लोक काय म्हणतात ते.. वाचत रहा आणि मला शिकवत रहा....

अनुभव... क्षण वेचलेले...

मनस्वी राजन

2 comments:

  1. Rajan... do not stop.... continue writing.... its a rare skill... you must flourish it.

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Sir,

      Please use below link for my blog. There is problem with blogsport.com hence I am using wordpress.com.

      http://manaswirajan.wordpress.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4/

      Thanks a lot for you words !

      Delete